Kisan Care

ओळखलंत का मला ?

ओळखलंत का मला ?

मी मध्यम ऊंचीचे, पानझड होणारे झाड आहे. मादागास्कर हे माझं मुळ स्थान आहे. तिथुन दर्यावर्दी लोकांनी मला भारताच्या किना-यावर आणले. समुद्राकाठचा कोरड्या हवामानाचा प्रदेश मला खूप मानवतो. माझं खोड सरळ वाढतं पण फारसं जाड नसतं, साल राखाडी रंगाची असते. माझी मुळ जमिनीत जास्त खोल न जाता वरच्या थरातच पसरतात. फांदया नाजुक असून चटकन मोडतात. पावसाळया नंतर हळूहळू पाने गळायला सुरवात होऊन मे महिन्यात मला पूर्ण निष्पर्ण व्हायला होते. उन्हाळयात एप्रिल पासूनच फुलांचा बहार सुरू होतो. केशरी, लाल, तपकिरी रंगाच्या फूलांनी मी भरून जातो ! त्यानंतर शेंगा धरतात. बियांवरील आवरण टणक असते. माझी लागवड मुख्यत्वे शोभेचे झाड म्हणूनच केली जाते.

आता तरी ओळख पटली का माझी ?

मी आहे तुमचा आवडता गूलमोहर ! साहित्यिक मंडळीनी मला त्यांच्या साहित्यातून खूपच प्रसिद्धी दिलेली आहे. इंग्रजीत तर मला अनेक नावांनी ओळखतात उदा. रॅायल पिकॅाक, फायर ट्री, फ्लॅम्बायंट इत्यादी तमिळमध्ये मी ‘मयरम’ तर तेलुगूमध्ये ‘शिमा संकेसुला’ या नावांनी परिचित आहे.