Kisan Care

भात पिकावरील खोडकिड

भात पिकावरील खोडकिड

भात रोपवाटिका तयार करताना पिकावर खोड किडीचा (Rice steam borer) मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. शेतक-यांना ही किड ओळखणे सोपे असते. याचा पतंग दोन सेंटीमीटर लांब असून समोरील पंख पिवळे असून मागील पंख पांढरे असतात. नराच्या पंखावर ठिपका नसतो. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील बाजूस प्रत्येकी एक काळा ठिपका असतो.

अळी रोपवाटीकेमध्ये सुरवातीस कोवळया भागावर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते परिणामी रोपाचा गाभा मरतो.

नियंत्रण : १) किडीचे प्रमाण कमी असतेवेळी किडग्रस्त फुटवे मुळांसह काढून घ्यावेत २) प्रादुर्भाव दिसताच प्रति एकरी ट्रायकोडर्मा जापोनिकम या मित्रकिटकाची ३०,००० अंडी एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा शेतात सोडावित.

३) पुनर्लागवडीपूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॅास (२०% प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्याच्या द्रावणात १० ते १२ तास बुडवून नंतर लागवड करावी.

४) फवारणी करावयाची असल्यास फिप्रोनील (५%प्रवाही) ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात करावी.