Kisan Care

Mushroom

जगभरात मशरूमच्या अंदाजे २२ हजार प्रजाती आहेत. त्यापैकी २० ते २५ खाद्य प्रजाती आहेत. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. मधुमेह असणा-यांसाठी हा चांगला आहार आहे. मशरूम हा क्रोमीयम चा चांगला स्त्रोत आहे. रक्तातील साखरेची योग्य पातळी राखण्यास हा घटक मदत करतो. यामध्ये कर्बोदकांचे आणि चरबीचे प्रमाणही कमी असते. मशरूममध्ये नैसर्गिक प्रतिजैविके आणि कर्क रोगप्रतिकारक गुणधर्म असतात.

मशरूमपासून तयार करण्यात येणा-या सूप पावडर, लोणचे, आरोग्यवर्धक पेय इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनांना देशात खूप मागणी आहे.