Kisan Care

Cauliflower

फूलकोबी पिकातील ‘व्हिप टेल’ विकृती

फूलकोबी पिकातील हा रोग नसून ‘मॅालिब्डेनम’ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरते मुळे ही विकृती दिसून येते. आम्लवर्गीय जमिनीमध्ये या घटकाच्या उपलब्धतेला अडथळे येतात. या विकृतीमध्ये पाने खुरटलेली व अरुंद होतात. पाने चाबकाच्या आकारा सारखी लांब वाढलेली दिसतात.

नियंत्रणात्मक उपाय योजना-

जमिनीची आम्लता ४.५ पेक्षा कमी आढळल्यास जमीनीत चुना मिसळून आम्लता कमी करावी.

अमोनियम किंवा सोडियम मॅालिब्डेट १.२० किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावे.

किंवा गरजेनुसार ०.२५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पिकावर फवारणी करावी.