Kisan Care

Ground-nut

Ground-nut

भुईमुगाच्या पिकातील तण काढावेत, पिकात पाणी साठू देवु नये. पाने गुंडाळणा-या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.

भुईमुगाच्या पेरणीपासून ३५ दिवसांनी डव-याच्या साहाय्याने पिकाला भर द्यावी, त्यानंतर आंतरमशागतीची कामे करू नयेत.

शेंगातील दाणे चांगल्या प्रकारे भरण्यासाठी ३०० ते ५०० किलो जिप्सम प्रति हेक्टरी आ-या फुटण्याच्या अवस्थेत जमिनीत मिसळून द्यावे.